चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने संपविले पत्नीला गडचिरोली जिल्ह्यातील घटना



गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
अहेरी: 
मिळालेल्या माहितीनुसार
पत्नीच्या चारित्र्यावर

संशय घेऊन पतीने तिची कुन्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना काल १७ जुलै रोजी तालुक्यातील मांड्रा गावात घडली.

सदाशिव लखमा नैताम (४५) असे आरोपी पती नाव असून रत्ना सदशिव नैताम (३५) मृतक महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सदाशिव हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे पतीपत्नी मध्ये

अशातच (ता. १७ जुलै) बुधवारी सकाळच्या सुमारास दोघांत जोरदार वाद झाला. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की आरोपी पतीने पत्नीच्या तोंडावर आणि मानेवर कुन्हाडीने सपासप हे द्वार करून ठार केले.

कुन्हाडीच्या वाराने रत्ना ही जमिनीवर कोसळली, त्या निपचित पडून असलेल्या ठिकाणच्या बाजूलाच आरोपी पती सदाशिवही आराम करत बराच वेळ बसून होता.

घटनेच्या वेळी मुलगा आपल्या शेतात कामाला गेला होता, त्यामुळे घरी दोघेच पती-पत्नीच होते, अशातच घरी कोणी नसल्याची

संधी साधून सदाशिवने पत्नीशी वाद घालून तिची कुन्हाडीने हत्या केली.

सदर घटना आरोपीचा पुतण्या राहुल नैताम याच्या निदर्शनात आली, त्याने घटनेची माहिती शेतात काम करणाऱ्या चुलत भावाला दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी सदाशिव नैताम याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.

घटनेचा पुढील तपास जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दासुरकर यांच्या मार्गदर्शनात दामरंचा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे व पोलीस प्रशासन करीत आहेत.

0/Post a Comment/Comments