गडचिरोली सुपरफास्ट
न्युज वृत्तसेवा
प्राप्त माहितीनुसार
पुणे : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केला. त्यावेळी बनवलेला व्हिडीओ पीडितेच्या आई-वडिलांना अन्य मोबाइल नंबरचा वापर करून व्हॉट्सअॅपवरून पाठविला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल ताज शेख (२२, रा.
यशोदीप चौक, वारजे माळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल शेख हा मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानादेखील त्याने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवताना आरोपी पीडित मुलीचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ त्याच्या मोबाइलमध्ये काढले. त्यानंतर आरोपीने वारंवार मुलीवर अत्याचार केले.
07/07/2024
Post a Comment