मासे पकडण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा तलावात बुडून झाला मृत्यू...गाव परिसरात होत आहे हळहळ व्यक्त, देसाईगंज तालुक्यातील घटना...



गडचिरोली सुपरफास्ट 

 न्यूज वृत्तसेवा

देसाईगंज

देसाईगंज तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंडाळा येथे गाव तलावांमध्ये बुडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वंश विजय भुते वय आठ वर्षे असे मृतक बालकाचे नाव आहे सदर घटना 20 जुलै रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उघडकिस. आली मिळालेल्या माहितीनुसार कोंडाळा येथील वंश भुते व घराशेजारील दोन ते तीन मुले शनिवारला दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या तलावामध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते मात्र काही वेळानंतर सोबत असलेली मुले आपापल्या घरी आले मात्र वंश हा घरी आला नाही एकटाच तलावाजवळ राहिला गावातील काही नागरिक सतत पाणी येत असल्याने तलाव पाण्याने किती भरला म्हणून बघण्याकरिता गेले असता त्यांना तलावातील पाण्यावर एक मुलगा तरंगताना त्यांना दिसला आणि त्या मुलाचे शालेय कपडे सुद्धा तलावाच्या पाळीवर दिसले असता लगेच तलाव बघण्याकरिता गेलेल्या लोकांनी गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली .पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतक मुलाला पाण्यातून बाहेर काढले आणि घटनेच्या पंचनामा करून मृतक बालकाचे शव शवविच्छेदनाकरिता देसाईगंज ग्रामीण रुग्णालय येथे पाठवीले .सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत

0/Post a Comment/Comments