गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
मूनिश्र्वर बोरकर
संपादक
गडचिरोली
- पतसंस्था व महाराष्ट्र बँकेचे कर्ज परतफेड न केल्यामुळे तसेच पुरामुळे पिकपाणी होणार नाही. कर्ज कसे फेडायचे म्हणुन लांजेडा येथील निकोडे नावाच्या व्यक्तीने आत्महता केली . लांजेंडा येथील जगदिश अंबादास निकोडे ४३ वर्ष यांचेकडे राधाकृष्ण नागरी पथसंस्था मर्या . गडचिरोली व महाराष्ट्र बॅक गडचिरोली याचेकडून कर्ज घेतले होते सदर बँकेच्या कर्मचारी वारंवार वसुलीसाठी तगादा लावत होते तश्यातही पिकपाणी होणार नाही या विवंचनेतून जगदिश यांनी दि २ ५ ला सांयकाळी घरी कुणी नसल्याचे बघुन टोकाचा निर्णय घेऊन आपली जिवनयात्रा संपविली . गडचिरोली पोलीसांनी मर्म दर्ज करून अधिक तपास सुरु आहे. मात्र पत्नीसमोर दुखाः चा डोंगर उभा ठोकला आहे.
Post a Comment