लाचेची मागणी करणारा पोलिस अधिकारी सापडला एसीबीच्या जाळ्यात ,तीन लाख रुपये लाचेची केली होती मागणी....




वृत्तसंस्था

पुणे महावितरण

विभागातील एका शासकीय कर्मचाऱ्याला दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी व ती टाळण्यासाठी ३ लाखांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. तानाजी सर्जेराव शेगर असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तानाजी शेगर हे पोलीस उपनिरीक्षक होते. पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत त्यांची नेमणूक चंदननगर पोलीस ठाण्यात होती.

महावितरण विभागात काम करणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीवर चंदननगर पोलिसांत

मीटर चोरी प्रकरणात तक्रार दाखल होती. या तक्रारीची चौकशी उपनिरीक्षक तानाजी शेगर यांच्याकडे होती. तेव्हा शेगर यांनी गुन्ह्याचा तपास आपण करत असून, पुढील कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी इतके पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात तडजोडीअंती ३ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. एसीबीच्या तपासात शेंगर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

0/Post a Comment/Comments