गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
प्रतिनिधी : दिलीप अहिनवे
भिवंडी, दि. २७ : भिवंडी तालुक्यातील गोवे गावात जागृत व पुरातन पारदेव मंदिर आहे. न्यु पारदेव प्रतिष्ठान मंडळ व रोटरी क्लब भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाला रोटरी क्लब भिवंडीचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील, सचिव सुधाकर म्हात्रे, पदाधिकारी विशाल भोईर, शत्रुघ्न पाटील, समीर म्हात्रे, रोहिदास भोईर, कैलास पाटील, अनिल पाटील व संतोष पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी पारदेव प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक हृदयनाथ पाटील यांनी सांगितले की, आमच्या गावातील पारदेव हे जागृत व पुरातन देवस्थान आहे. कोणाच्या लक्षात येत नव्हते की, येथे काही सुधारणा करावी. येथे डुकरे येऊन घाण करतात. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्याला बाधा येते. काहीतरी करावे म्हणून आम्ही आमच्या गोवे गावाला आवाहन केले की, आपण सर्वांनी येथे काहीतरी सुधारणा करुया. सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे वर्गणी काढून मंदिर परिसरात सुधारणा केली. आम्ही मंदिराला भिंतीचे कुंपण घालून मंदिर परिसर सुरक्षित केला. रात्री अपरात्री या परिसरात कोणी मनुष्य चालत असला तर गावच्या वेशीवरील जागृत देवस्थान त्या व्यक्तीचे संरक्षण करते, असे आमच्या गावातील बुजुर्ग सांगत आहेत. अनेक बाजुच्या गावांमध्ये देखील हे देवस्थान प्रसिद्ध आहे. अनेक भाविक श्रद्धेपोटी येथे नेहमी दर्शनासाठी येत असतात. आमच्या गावातील निवडक १२ व्यक्तींनी दोन वर्षांपूर्वी न्यू पारदेव प्रतिष्ठान मंडळ स्थापन केले. यावर्षी आम्ही भिवंडीतील रोटरी क्लबच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. रोटरी क्लबने येथे विविध वृक्षांची लागवड केली असून आम्ही त्या वृक्षांचे संगोपन करणार आहोत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू पारदेव प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक हृदयनाथ पाटील, अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष मधुकर पाटील, सचिव शशिकांत पाटील, सहसचिव सदू भोईर, खजिनदार शंकर भामरे, सहखजिनदार विठोबा पाटील, तसेच इतर पदाधिकारी हनुमान पाटील, प्रवीण पाटील, कचरु पाटील, बाबू पाटील व अंकुश पाटील यांनी खुप मेहनत घेतली.
Post a Comment