अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे ,लहुजी क्रांती मोर्चा ची मागणी




गडचिरोली सुपरफास्ट 
न्यूज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर 
संपादक 
गडचिरोली -लहुजी क्रांती मोर्चा जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले . हे निवेदन महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी देण्यात आले. या निवेदनात म्ह ।टले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे .देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे साहित्य जगातील २७ भाषेमध्ये प्रकाशित झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी साता समुद्रापलीकडे गायन केला आहे .त्यामुळे १ ऑगस्टला त्यांच्या जयंती दिनानिमित्त मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावे . १ ऑगस्टला सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावे .अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात यावे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जदारांसाठी जाचक अटी शिथिल करावे. त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार लवकरात लवकर निकाली काढावे .मातंग व तत्सम जातीवरील होत असलेले अन्याय व अत्याचाराच्या घटनाचा तपास एसआयटीकडे देऊन खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवावे.
या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले. निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर बावणे , भोजराज काणेकर , प्रमोद बांबोळे ,प्राध्यापक राजेंद्र लांजेकर ,आनंद अलोणे, यज्ञराज जनबंधू उपस्थित होते.



0/Post a Comment/Comments