महा अनिसचे नागपूर येथे भव्य वृक्षारोपण.....




 गडचिरोली
 सुपर फास्ट न्युज वृत्तसेवा 
मुनिश्वर बोरकर 
संपादक
नागपूर-
गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच नायक फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरातील प्रमुख चार बौद्ध विहारात वृक्षारोपण करण्यात आले.सर्वप्रथम रमाआई बौद्ध विहार रमाईनगर नागपूर येथे आयु.देऊळकर व मा.खांडेकर यांचे अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे,प्रा पुष्पा घोडके, देवानंद बडगे, इंजी कमलाकर सतदेवे,वंदना लांजेवार, आनंदी वैद्य , शरद चौरपगार यांनी वृक्षारोपण केले. तद्नंतर शीलगंध बुद्धविहार विश्राम नगर सुगतनगर रोड येथे विहार



 कमेटी चे अध्यक्ष आनंदराव लोणारे व कार्यवाह सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात रामभाऊ डोंगरे यांनी महाअंनिस बद्द्ल संक्षिप्त माहिती दिली,संचालन चित्तरंजन चौरे यांनी केले, तर वृक्षारोपण नायक फाऊंडेशनचे चंदु पाटील, अजय खोब्रागडे व विहार कमेटीचे पंढरी लाडे ,चंद्रमणी सुखदेवे,राजेन्द्र शेंडे,सुधिर मेश्राम,ताराचंद वंजारी यांचे हस्ते करण्यात आले.
राहुल बोधी बुद्ध विहार गौतमनगर येथे सुमित्रा चौधरी व सविता मडामें यांच्या नेतृत्वाखाली शीला डोंगरे,गंगा खांडेकर, नरेश महाजन,शोभा धमगाये ,मीना गजभिए,दिगांबर चोखांद्रे,सुदास मेश्राम यांनी वृक्षारोपण केले.




समारोपीय वृक्षारोपण धम्मप्रीय बुद्ध विहार कल्पनानगर येथे मा.नगरसेवक गौतम पाटील यांचे अध्यक्षतेखाली यमुना रामटेके,प्रतिमा कोचे, दिप्ती नाईक, अविनाश डोंगरे, सिंधु चारभे, पौर्णिमा वानखेडे,विभा मेश्राम, वर्षा शहारे व उषा पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण पार पडले. नायक फाउंडेशन च्या वतीने अशोक व बोधीवृक्षाची झाडे तर महाअंनिस ने फुलझाडे प्रदान केले.
समारोपीय कार्यक्रम यशवंत घोडके यांच्या प्रांगणात महाअंनिस उत्तर नागपूर चे अध्यक्ष विभुती चंद्र गजभिये यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी नायक फाऊंडेशनचे चंदु पाटील यांनी उद्योजक कसे बनता येईल या बाबतीत उपयुक्त माहिती दिली तर उद्योजकअजय खोब्रागडे यांनीही संबोधन केले .गंगा खांडेकर व देवानंद बडगे यांनी चळवळीचे गीत तर चित्तरंजन चौरे यांनी पावसाच्या कविता सादर केल्या. आभार इंजी.यशवंत घोडके यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.पुष्पा घोडके व परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments