कोजबी येथील युवतीची अहमदनगर शहर राकॉ ओबिसी महिला उपाध्यक्षपदी निवड ला उपाध्यक्ष पदी निवड..



गडचिरोली सुपरफास्ट 
 नुज वृत्तसेवा 
आरमोरी 

आरमोरी तालुक्यातील कोजबी या खेडेगावातील गौरी दिलीप दुमाने हीची अहमदनगर जिल्ह्याच्या ओबीसी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. कोजबी येथील दिलीप दुमाने

हे गेल्या सात-आठ वर्षांपासून रोजगारासाठी आपले गाव सोडून संपूर्ण कुटुंबासह अहमदनगर येथे खाजगी कंपनीमध्ये काम करायला गेले. कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी मुलगी गौरी हिला सुद्धा कंपनीत नोकरी मिळवून दिली. परंतु गौरी हिला समाजकार्याची आवड असल्याने ती आपली

नोकरी सांभाळून लोकांच्या संपर्कात राहून सामाजिक कार्य करत होती. तिच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अहमदनगर शहर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष

रेणुका पुंड यांच्या मार्गदर्शनात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रेशमा आठरे, श्रमिक सेल संघटना अध्यक्ष

रंजना उकरडे, उर्मिला काडे, श्रद्धा जाधव आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत गौरी दुमाने हिच्याशी संपर्क केले असता तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार संग्राम जगताप यांना अभिप्रेत असणारी पक्षाची संघटना बांधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कोजबी या खेड्यातून जाऊन अहमदनगर सारख्या मोठ्या शहराच्या महिला उपाध्यक्षपदी निवड झाल्याने परिसरातील नागरिकांकडून गौरी दुमाने हिचे अभिनंदन होत आहे .

0/Post a Comment/Comments