शासन आपल्या दारी ऑफिसात जनता चक्रामारी ,कर्मचारी मजा मारी, खासदारांनी गडचिरोली येथे जनता दरबार घ्यावे ,नीलकंठ संदोकर यांची मागणी...



गडचिरोली _
 मुनिश्वर बोरकर
संपादक 
 गडचिरोली - गडचिरोली जिल्हाचे ठिकाण असून जिल्ह्यातील नागरिकांना बरेच कार्यालयामध्ये कामा करिता यावे लागते. परंतु कर्मचाऱ्यांचे एडेलपट्टू धोरणामुळे व शासनाने घोषित केलेल्या योजना व निधी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झालेला आहे.आमदार सायबांना जनतेचे प्रश्न,योजना व मंजूर झालेली निधी मिळाली नाही मिळाली काहीही फरक पडत नाही.परंतु जनता हवालदिल झाली आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना पन्नास हजार रूपये अनुदान मिळाले नाही, मोदी आवास योजना घरकुचे रूपये मिळाले नाही, श्रावणबाळ, संजय गांधी, पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी घरकुल करिता चातका सारखी वाट पहात आहेत परंतु यादी मंजूर नाही. म. ग्रा. रॊ. हमी योजना ची मजुरी आली नाही. तरीपण लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी पोरगी,मोफत राशन, मोफत प्रवास,व इतर योजना या सर्व योजना मार्गी लावणे करिता मा खासदार साहेबांनी वर्षातून तीन जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावे. पन जनता दरबार घेतल्या नन्तर दोषी कर्मचाऱ्यावर कार्यवाही करा वाड्यावर बोलावू नका नाहीतर जनतेचा विस्वास राहणार नाही. "शासन आपल्या दारी, आफीसात जनता चकरा मारी, कर्मचारी मजा मारी " अशी मागणी निलकंठ सदोकर पोर्ला यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments