बऱ्याच महिन्यापासून करत होता अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, वेळ "आली, अन् अटकला पोलिसांच्या पिंजऱ्यात...



गडचिरोली सुपरफास्ट 
 न्यूज वृत्तसेवा 
कुरखेडा (गडाचरोली):- कुरखेडा शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून कुरखेडा येथील आझाद वार्ड रहिवासी असलेल्या शुभम सुरेश जौसीया वय २७ वर्षे या युवकाला , शनिवारी २० जुलै दुपारी २ वाजे अटक करण्यात आली.

२७ वर्षीय युवक कुरखेडा येथील एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा व साधेपणाचा गैरफायदा घेवून मागील काही महिन्यांपासून त्या मुलीचे लैंगिक शोषण करीत होता. ही बाब तिच्या घरच्यांना कळताच लगेच घरच्यांनी कुरखेडा पोलिसांत धाव घेवून युवकाच्या विरोधात पोलीस स्टेशन कुरखेडा येथे तक्रार दाखल केली.मुलीच्या घरच्यांच्या तक्रारीवरून आरोपी शुभम याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ६४ (१),६४(२) एमआय., ६५ तसेच पोस्को कायदा ४,६,८,१०,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपीला गुन्हा दाखल झाल्याची कूणकूण लागताच तो फरार झाला . मात्र पोलीसांनी तत्परता कर्तव्य दाखवत दोन दिवसातच गोपनीय सूत्रांच्या आधारे त्याला अटक केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे व पोलीस हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत .

0/Post a Comment/Comments