ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व इतर सहकारी सापडले एसीबी पथकाच्या जाळ्यात...



गडचिरोली सुपरफास्ट

 न्यूज वृत्तसेवा

यवतमाळ

वरुड खेड येथील विकासात्मक काम पाणंद रस्त्याचे काम वेळेवर व्हावे आणि आणि कामाचे बिल वेळेवर निघावे याकरिता ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच यांनी कत्त्रटदाराला दीड लाख रुपयाची लाच मागणी केल्याची घटना उजेडात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दारवा तालुका अंतर्गत वरुड खेड गावातील शेतशिवारालगत पानंद रस्त्याचे काम मंजूर झाले आणि हे काम कत्राटदाराला मिळाले कत्राटदाराने काम सुरू केले असता गावातील सरपंच उपसरपंच आणि इतर सहकारी यांनी कत्राटदाराला वेळेवर बिल निघण्याकरिता व काम सुरळीत होण्याकरिता दीड लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली परंतु कत्राटदाराच्या मनात लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कत्राटदाराने एसीबी पथकाला याची माहिती दिली. एसीबी पथकाने लगेच सापळा रचून दीड लाख रुपयाच्या लाच प्रकरणी वरुडखेड ग्रामपंचायत सरपंच निलेश प्रकाश राऊत वय 35 वर्ष उपसरपंच गजानन तुळशीराम मनवर वय 40 वर्षे व इतर सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे घटनेचा तपास एसीबी पोलीस निरीक्षक अमित वानखडे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments