दिनेश बनकर
मुख्य संपादक
गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
अज्ञात दुचाकी स्वराच्या धडकेत लोहारा येथील
इसमाचा मृत्यू.....
आरमोरी:- मिळालेला माहितीनूसार आरमोरी तालुका स्थळापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या रांगी - लोहारा मार्गावर अज्ञात दुचाकीस्वरांनी दिलेल्या धडकेत लोहारा येथील इसमाचा मृत्यू झाला.
तुळशीराम संभाजी मशाखेत्री वय 72 वर्ष मु. लोहारा ता. आरमोरी जी. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
मोह वेचण्याकरिता गेलेल्या पत्नीला आणायला जात असता रांगी मार्गाने येणाऱ्या MH 33 K1101 क्रमांक च्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यामधे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला .
त्यांना उपचाराकरिता नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
परिवारातील कर्ता पुरुषाच्या अपघाती निधनाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Post a Comment