घरातील काम य करीत असताना एकाएक भोवळ येऊन पडलेल्या



 आरमोरी, (वा.). घरातील काम य करीत असताना एकाएक भोवळ येऊन पडलेल्या महिलेला उपचारार्थ जिल्हा र्थ सामान्य रुग्णालयात नेले जात असताना रस्त्यातच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास ठाणेगाव येथे घडली. अर्चना दिलीप नैताम (38) रा. ठाणेगाव, असे मृत महिलेचे नाव आहे..
सविस्तर वृत्त असे की, ठाणेगाव येथील नागरिक तसेच तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीप नैताम


यांच्या पत्नी अर्चना बुध वा री सकाळच्या सुमारास घरातील काम करीत होते... एकाएक त्या भोवळ येऊन पडल्या. तत्काळ कुटुंबीयांनी त्यांना उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

0/Post a Comment/Comments